ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पालकमंत्री नितेश राणे यांची महावितरणच्या नियंत्रण कक्षाला भेट.

पालकमंत्री नितेश राणे यांची महावितरणच्या नियंत्रण कक्षाला भेट.

प्रकाशन: 31 May 2025 10:56 AM
वाचन संख्या 191

कुडाळ | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विद्युत पुरवठ्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या तक्रारीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवार, ३० मे रोजी अचानक भेट दिली. यावेळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेत कामकाजात अनेक सुधारणा कराव्या लागतील अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अनेक गावं विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे काळोखात राहिली. या घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना तात्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करून यामध्ये आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान हा कक्ष कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालय येथे उभारण्यात आला आहे आणि या कक्षामध्ये कशाप्रकारे काम चालू आहे याची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी नियंत्रण कक्षाला भेट दिली. या कक्षामध्ये दाखल झालेल्या तक्रारी आणि त्यांचे किती तासाने निरासन झाले याची विचारणा करून तक्रारी असलेल्या पुस्तकाची पडताळणी केली तसेच ऑनलाईन असलेल्या तक्रारीची माहिती घेतली.

यावेळी कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या. या नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे. आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे. यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका. तसेच तासानतास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच महावितरणचे अधिकारी, उपस्थित होते.

सौजन्य | कुडाळ ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स