ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
नूतन गीता पाठशाळेचे उद्घाटन.

नूतन गीता पाठशाळेचे उद्घाटन.

प्रकाशन: 31 May 2025 12:39 PM
वाचन संख्या 255

मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ येथे सोमवार, २६ मे रोजी ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व – विद्यालय’ या संस्थेच्या गीता पाठशाळेचे उद्घाटन करण्यात आले. परशुराम पवार यांच्या घरी गेले २५ वर्षे गीता पाठशाळा सुरू आहे. या पाठशाळेचा नूतनीकरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या उद्घाटनप्रसंगी सुरूवातीला ध्वजाला वंदन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर माउंट आबूचे वरिष्ठ राजयोगी छोटेलाल भाई, पुणे सबझोन असिस्टंट प्रमुख राजयोगिनी नलिनी दीदी, पुणे – मिरा सोसायटी प्रमुख उषादीदी, गोवा सबझोन प्रमुख राजयोगिनी शोभा दीदी, कणकवली केंद्रप्रमुख संध्या दीदी हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि परम पिता परमात्मा शिव यांच्या प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राजयोगी छोटेलाल भाई म्हणाले की, आपण जे विचार करू तशी परिस्थिती बदलते. सकारात्मक विचार जीवन सुखदायी करतात तर नकारात्मक विचारांनी जीवन दुःखदायी होते.

तसेच राजयोगिनी नलिनी दीदी म्हणाल्या की, ह्या सेवाकेंद्रामुळे तंटामुक्त, व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी, तणावमुक्तीसाठी राजयोगचा चांगला उपयोग होईल.

राजयोगिनी शोभा दीदी म्हणाल्या की, इथे सर्व सेवा विनामूल्य असून या ईश्वरीय ज्ञानाची सर्वांना गरज आहे. राजयोग अर्थात मनाच्या एकाग्रतेने विश्व एकता व आपापसात विश्वास निर्माण होऊन हे जग स्वर्ग बनेल. शाहीर

या कार्यक्रमात कोल्हापूरचे शाहीर बापू भाईंनी कुंभारमाठ गाव तसेच परशुराम पवार यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला.

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त केक कापून ह्या पाठशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

अशाप्रकारच्या गीता पाठशाळेचे उद्घाटन रविवार, २५ मे रोजी राठिवडे येथेही झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

यावेळी परशुराम पवार यांच्या पत्नी आणि त्यावेळच्या संचालिका कै. शोभा पवार यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करण्यात आले.

यावेळी मालवणच्या प्रमुख वर्षा दिदी आणि गोवा, कोल्हापूर, राजापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मडगाव केंद्रप्रमुख राखी दीदी यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स