पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शैक्षणिक गुणवंत आणि शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे. दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रशासनातील अधिकारी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुका स्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज दहिकर, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा बँकेच अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.
इयत्ता १० वी मध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मधील. कु.आर्या राणे आणि कु. श्रेयस बर्वे आणि कुडाळ हायस्कूल मधील कु. चैतन्या सावंत या तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्मितेश कडुलकर, रेश्मा पालव, विधी चिंदरकर, ध्रुव तेंडुलकर, हर्षदा हडलगेकर या पाच विद्यार्थ्यांनी ९९.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर नक्षत्रा काळे या विद्यार्थीनीने ९९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. इयत्ता बारावी मधील विज्ञान शाखेतील जाधव अथर्व अतुल, तेंडुलकर मधुकर विवेक, पालव काशीराम विठोबा, कला शाखेतील दळवी तनिषा विनय, कोकरे प्रियंका प्रकाश, मांजरेकर मानसी पांडुरंग तर वाणिज्य शाखेतील भोगटे आयुषी रुपेश, वाळुंजे चित्राली राजेश, परब तनुज निलेश या विद्यार्थ्यांना देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली शासकीय कार्यालये-
१. उपविभागीय कार्यालय, कणकवली, (३ रा क्रमांक)
२. तहसिलदार कार्यालय, कणकवली (२ रा क्रमांक)
३. गट विकास अधिकारी कार्यालय, कणकवली (३रा क्रमांक)
४. तालुका कृषि अधिकारी कार्यालय, वेंगुर्ला (३ रा क्रमांक)
५. पोलिस निरीक्षक, मालवण (३ रा क्रमांक)
६. उप अभियंता कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, देवगड (३ रा क्रमांक)
७. सहायक पशुसंवर्धन कार्यालय, (२ रा क्रमांक)
८. पशुधन विकास अधिकारी कार्यालय, कणकवली (प्रथम क्रमांक)
९. मख्याधिकारी कार्यालय, वेंगुर्ला (३ रा क्रमांक)
१०. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, सावंतवाडी (२ रा क्रमांक)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)