ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कै. सौ. रुपालीताई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवेच्या आठवणींना उजाळा.

कै. सौ. रुपालीताई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवेच्या आठवणींना उजाळा.

प्रकाशन: 30 May 2025 11:25 PM
वाचन संख्या 204

स्विमींग गृपच्या वतीने आदरांजली.

अक्कलकोट | प्रतिनिधी : अक्कलकोट येथील, श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष / नगरसेवक महेश इंगळे यांच्या दिवंगत पत्नी कै. सौ. रूपालीताई इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना, स्विमींग गृपच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलीत सी. बी. खेडगी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक शिवशरण अचलेर यांनी दिवंगत सौ. रुपालीताईंच्या अध्यात्मिक सेवेच्या आठवणींना मनोगताद्वारे उजाळा दिला. शुक्रवार, ३० मे रोजी कै. सौ. रुपाली इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमीत्त येथील स्विमींग ग्रुपच्या वतीने सर्व सदस्यांच्या उपस्थितीत स्विमींग ग्रुपचे सदस्य संतोष पराणे यांच्या हस्ते कै. रूपाली इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

बालवयातील शालेय जीवनापासून शिक्षणासोबतच इतरांना मदत करणे, निराधार गोरगरीबांना मायेचा घास भरविणे. आपल्या मित्र – मैत्रिणींसोबत आसपासच्या गरजूंना संकटकाळात आवश्यक ती मदत करून त्यांना मानसिक धीर देणे, प्राणीमात्रांवर दया मायेचा वरदहस्त ठेवून माणुसकीची वागणूक देणे इत्यादी छंद जोपासून जीवनाची सुरुवात केली होती. हे करताना जीवनात आपल्या कार्याप्रती तत्व व निष्ठा असली पाहिजे असे ते नेहमी सांगत असत. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या पुढील जीवनातही त्यांनी आपल्या तत्वांना नेहमीच प्राधान्य दिले. काहीजण जीवन मार्गातून कधीच जाऊ नये असे काही व्यक्तीमत्व असतात, त्यापैकीच त्या काळी सर्वांना हवे हवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे कै.सौ. रूपालीताई इंगळे. त्यांच्या स्मृती ताज्या झाल्या की नेहमीच वाटते.

कै. सौ. रुपालीताई ह्या धार्मिक मनोवृत्तीच्या होत्या. त्या भक्ती मार्गातील एक महान पूजक होत्या. त्या नेहमी भारतीय संस्कृतीतील देव देवतांची पूजा, विधी, उपवास, नामस्मरण करीत असत. भगवान गणेश, मारुती, महादेव, खंडोबा, सौंदत्ती यल्लमा देवी येथील श्री स्वामी समर्थ महाराज, पंढरीचे पांडुरंग अशा अनेक विविध देवदेवतांचे त्या भक्त होत्या. याशिवाय त्या अनेक धार्मिक गुरुजनांची तन – मन- धनाने सेवा करीत असत. विविध सण उत्सवाच्या प्रसंगी स्वामीजींना, गुरुजनांना घरी बोलावून विधिवत पूजा करून भक्तिमय वातावरणात परिवारासह इतरांनाही भक्तीमय आनंद देण्याचा त्यांचा हा स्वभाव होता तसेच त्या उच्च विद्याविभूषित होत्या.

यावेळी स्विमींग ग्रुपच्या अन्य सदस्यांनीही कै. सौ. रुपालीताई इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी स्विमींग ग्रुपचे सदस्य व महेश इंगळे मित्र परिवारचे सदस्य युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे, सुनिल कटारे, शिवपुत्र हळगोदे, प्रसाद पाटील सर, रामचंद्र समाणे, जगताप सर, कुमार हत्तूरे, संतोष पराणे, अंकूश केत, मनोज इंगुले, सोमनाथ सुतार, चंद्रकांत सोनटक्के, ज्ञानेश्वर भोसले, बाबा सुरवसे, राजू एकबोटे, बाळासाहेब एकबोटे, अमर पाटील, श्रीकांत झिपरे, शैलेश राठोड, अशोक कलशेट्टी सर, सचिन किरनळ्ळी मालक, विश्वनाथ देवरमनी सर, जवळगे सर, प्रसन्न हत्ते, सुनिल पवार, रमेश शिंदे सर, वार्ताहर अरविंद पाटील, राजेश जगताप, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी, नंदकुमार जगदाळे, आदीत्य गवंडी, दर्शन घाटगे, डॉ.हिरण्णा पाटील, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ मुसळे, स्वामीनाथ लोणारी, रविराव महिंद्रकर, धनराज स्वामी, लेखापाल ओंकार उटगे, वैरागचे नगरसेवक राजाभाऊ इंगळे, श्रीकांत मलवे, साहील पवार, गिरीश पवार, महांतेश स्वामी, गणेश काटकर, महेश काटकर, पवार आदींसह अन्य उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 304

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स