ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आ. निलेश राणे यांची माणगाव खोऱ्यातील पुलांची पाहणी.

आ. निलेश राणे यांची माणगाव खोऱ्यातील पुलांची पाहणी.

प्रकाशन: 30 May 2025 10:16 AM
वाचन संख्या 93

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले दर्जेदार कामाचे निर्देश.

कुडाळ | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांनी गुरुवार, २९ मे रोजी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथील पुलाची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी, दुकानवाड येथे गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाच्या सुरु असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या पुलाचे बांधकाम मजबूत, दर्जेदार आणि व्यवस्थित व्हावे असे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.

त्याचप्रमाणे साळगाव माणगाव पंतप्रधान सडक रस्त्याच्या कामाचीही पाहणी करून वाहतूक सुरळीत सुरू व्हावी यासाठीच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. धीरज पिसाळ, श्री. मोहिते, मोहन सावंत, माणगाव खोऱ्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स