ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रेवंडीत जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात.

रेवंडीत जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात.

प्रकाशन: 30 May 2025 11:59 AM
वाचन संख्या 93

मसुरे | प्रतिनिधी : कुलस्वामी सेवा मंडळ तांडेलवाडी रेवंडी आयोजित भव्य खुली जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत गुरुनाथ तुळसकर आणि सायली राऊळ यांना विभागून प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

द्वितीय क्रमांक विभागून दिशम परब आणि स्वरा पावसकर, तृतीय क्रमांक विभागून समर्थ गवंडी आणि वैष्णवी बोडके तर उत्तेजनार्थ दूर्वा पावसकर आणि क्रांती पालव यांची निवड करण्यात आली.

प्रथम क्रमांक विजेत्याला विभागून रोख रुपये ११,१११/- श्री. नमित कांबळी व श्री. नागेश रामू कुऱ्हाडे पुरस्कृत रोख रक्कम व स्वर्गीय शुभदा रमाकांत कांबळी यांच्या स्मरणार्थ श्री. अभिजित रमाकांत कांबळी यांसकडून चषक देण्यात आले.

द्वितीय क्रमांक विजेत्याला विभागून रोख रु. ७,७७७/- व चषक श्री. नमित कांबळी व श्री. नागेश रामू कुऱ्हाडे पुरस्कृत रोख रक्कम व स्वर्गीय शुभदा रमाकांत कांबळी यांच्या स्मरणार्थ श्री. अभिजित रमाकांत कांबळी यांसकडून चषक तसेच तृतीय क्रमांक विजेत्याला विभागून रोख रुपये ५,५५५/- व चषक .श्री नमित कांबळी व श्री. नागेश रामू कुऱ्हाडे पुरस्कृत रोख रक्कम व स्वर्गीय शुभदा रमाकांत कांबळी यांच्या स्मरणार्थ श्री. अभिजित रमाकांत कांबळी यांसकडून चषक आणि उत्तेजनार्थ विभागून प्रत्येकी रु १,१११/- व चषक श्री. नमित कांबळी व श्री. नागेश रामू कुऱ्हाडे पुरस्कृत रोख रक्कम व स्वर्गीय शुभदा रमाकांत कांबळी यांच्या स्मरणार्थ श्री. अभिजित रमाकांत कांबळी यांसकडून चषक मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रदान करण्यात आले.

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे उदघाटन श्रीमती स्नेहल संतोष तळाशीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रेवंडी ग्रा. पं. सदस्य विराज तळाशीलकर, प्राजक्ता कांबळी, माजी सभापती सोनाली कोदे तळाशीलकर, मंडळाचे कार्यकर्ते विकास चेंदवणकर, पांडुरंग कांबळी, राजन तळाशीलकर, चंद्रशेखर कांबळी, बंटी तळाशीलकर, निशिकांत धुळे, निकिता कांबळी, अरुण कांबळी, अभिजित कांबळी, जयप्रकाश चेंदवणकर, सागर चेंदवणकर, अभिषेक तळाशीलकर, उन्मेष कांबळी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. दत्तप्रसाद पेडणेकर, श्री. सिद्धेश पालव, श्री. तारक कांबळी, श्री. अमोल कांबळी यांनी काम पाहिले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे आणि चषक प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन विराज तळाशीलकर यांनी केले. आभार नंदकिशोर कातवणकर यांनी मानले.

यावेळी या स्पर्धेत परीक्षक म्हणून असलेले श्री. दत्तप्रसाद पेडणेकर यांची तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स