शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट.
वेंगुर्ले | ब्यूरो न्यूज : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी भेट देऊन तेथील रुग्णालयीन कामकाजाचा आढावा घेतला. अपघात विभाग, औषध साठा वैद्यकीय अधिकारी ह्यांना रुग्णांना योग्य सेवा देण्याच्या सूचना दिल्या. कामामध्ये कसूर केलेले आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
अतिवृष्टी, साथीच्या आजारापासून आरोग्य यंत्रणा सज्ज असावी ह्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट दिली. त्यावेळी डॉ. सुबोध इंगळे, निवासी वैदकिय अधिकारी डॉ. शाम पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)