श्रावण येथील बीएसएनएल टाॅवर कार्यान्वित.
ब्यूरो न्यूज : श्रावण येथील बीएसएनएल टॉवर बंद होता. या संदर्भात स्थानिक कार्यकर्ते अभि लाड, योगेश परब शिष्टमंडळाने दोन दिवसापूर्वी मालवण बीएसएनएल कार्यालयाला भेट देत अधिकारी वर्गासोबत चर्चा केली. दरम्यान वराड येथील टॉवर वरून श्रावण येथील टॉवरला मायक्रोलेन्स जॉईन करून आम्हाला टॉवर चालू करून द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अधिकाऱ्यांनी दोन दिवसात टॉवर कार्यान्वित करुन देऊ अशी ग्वाही दिली. मुसळधार पावसामुळे कामात अडथळा येत होता. मायक्रोलेन्स टेस्टिंग काम थांबले होते. जवळील पाडलोस टॉवर वरून टेस्टिंग होत नव्हतं त्यामुळे टॉवर चालू झाला नव्हता. मात्र कार्यवाही पूर्ण करून टॉवर कार्यान्वित करण्यात आला. कित्येक वर्षे रखडलेलं मोबाईल टॉवरचे काम मार्गी लागले. अशी माहिती अभि लाड यांनी दिली.
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह बीएसएनएल सिंधुदुर्ग जिल्हा वरिष्ठ अधिकारी तसेच अधिकारी गोवेकर, फुटाणे यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)