काळसे बागवाडीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम.
तहसीलदार वर्षा झालटे यांच्या उपस्थितीत पूर परिस्थितीतील उपाययोजनांची तपासणी.
मालवण | ब्यूरो न्यूज : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तयारी तपासण्याच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात रंगीत तालीम काळसे बागवाडी येथे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
काळसे बागवाडी या भागात पूर स्थितीत अनेक घरांना पाण्याचा वेढा असतो. सध्या स्थितीत मे महिना असला तरी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे या पार्श्वभूमीवर ांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
ांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन सज्ज असल्याचे रंगीत तालीम निमित्ताने तपासण्यात आले.
अतिवृष्टीमुळे पेंडूर तलावाची पाणीपातळी वाढली आहे. याठिकाणी भेट देऊन तहसीलदार यांनी पाहाणी केली.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, आपत्कालीन यंत्रणा, लोकप्रतिनिधी, उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)