सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान.
आपत्ती प्रशासनाकडून तालुकानिहाय नुकसानीची माहिती जाहीर.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसापासून अवकाळी पडणाऱ्या अतिवृष्टिमुळे आतापर्यंत ५६ घरांचे व इतर मालमत्तेचे मिळून २१ लाख ४४ हजार १७० रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाजगी व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे ५४ पक्की घरे व २ कच्ची घरे असे एकूण ५६ घरांचे नुकसान झाले आहे. तर इतर एका मालमत्ताचे नुकसान झाले आहे. यामध्ये पक्की घरे २० लाख २४ हजार १७० रुपये, कच्ची घरे १ लाख ५ हजार, तर इतर मालमत्तेचे १५,००० असे मिळून आतापर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २१ लाख ४४ हजार १७० रुपये एवढे नुकसान झाले असल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील ४, कुडाळ तालुक्यातील ४ आणि देवगड तालुक्यातील ८, मालवण तालुक्यातील १६, दोडामार्ग तालुक्यातील ३, कणकवली तालुक्यातील ६, वैभववाडी तालुक्यातील ५ घरांचे तर सावंतवाडी तालुक्यातील १० घरे व एका इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)