ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणूक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणूक.

प्रकाशन: 26 May 2025 06:15 PM
वाचन संख्या 37

अध्यक्षपदी रविकिरण तोरसकर तर उपाध्यक्षपदी निशांत तोरसकर.

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ कोलगाव, सिंधुदुर्ग संस्थेतील विविध घटकातील सभासदांनी कोलगाव शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकत्र येऊन उभारलेल्या विद्यातपस्वी चिंतामणी तोरसकर स्वप्नपूर्ती पॅनेलचा विजय झाला आहे. रविवार २५ मे रोजी संस्थेची निवडणूक कोलगाव माध्यमिक विद्यालय येथे झाली.

यामध्ये अध्यक्ष श्री. रविकिरण तोरसकर, उपाध्यक्ष श्री. निशांत तोरसकर, सचिव सौ. पूनम नाईक, सहसचिव डॉ.ज्योती तोरसकर, खजिनदार श्री. हेमंत वालकर, कार्यकारीणी सदस्य श्रीम. संगीता तोरसकर, सौ. अलका नारकर, श्री. देवेंद्र राऊळ, श्री. मनोज सातार्डेकर, श्री. दयानंद सराफ, श्री. प्रवीण आचरेकर, श्री. गणेश आरोंदेकर, श्री. नितीन सावंत, सौ. चित्रलेखा हिंदळेकर, श्री. प्रसन्ना राठोड असे सर्व पंधरा सदस्य बहुमताने निवडून आले.

धर्मदाय आयुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या देखरेखी खाली सदरची निवडणूक पार पडली. विजयी उमेदवार यांना संस्थेचे आजीव सभासद डॉक्टर विवेक रेडकर व सर्व सभासदांनी तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालय कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन शैक्षणिक, क्रीडा, विषयक विषयात संस्था मजबुतीने काम करेल असा आशावाद व्यक्त केला अशी माहिती रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स