आचरा समुद्र किनारी भव्य व सुशोभीत गार्डन उभारण्याची मागणी!
शिवसेना पदाधिकारी समीर हडकर यांचे पालकमंत्री उदय सामंत यांना लक्षवेधी निवेदन ….!
आचरा | अनिकेत पांगे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गदृष्ट्या महत्वाच्या अशा आचरा समुद्रकिनारी भव्य गार्डन उभारणीसाठी निधी मिळावा बाबतचे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेना पदाधिकारी समीर हडकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रकाश वराडकर, जयंत पांगे, गजू गावकर, राजन पांगे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील निसर्गसंपन्नतेने नटलेले आचरा गांव हे येथील स्वयंभु व अतिप्राचीन असलेल्या सुप्रसिध्द इनामदार श्री देव रामेश्वराच्या जागृत देवस्थानामुळे कोकण भूमीसह सातासमुद्रापार ओळखले जाते. या आचरा गावास समुद्राची विस्तीर्ण किनारपटटी लाभलेली आहे. त्यामुळेच तेथे बारमाही पर्यटकांची वर्दळ असते निसर्गरम्य व शांत असलेला समुद्र किनारा, नैसर्गिक वैविधपुर्ण हरितसमृध्दी, जामडूल बेट त्याचबरोबर भौगोलिक दृष्टया दळण वळणाच्या दृष्टीने केंद्रस्थानी असलेले गाव यामुळेच अनेक पर्यटक, इतिहास संशोधक, इ. लोकांची पाउले गेल्या अनेक दशकापासून येथे वळत आहे. जवळव तांडवळी गावात प्रास्तावित असलेले सी-वर्ल्ड पासून हे गाव लगतच आहे.
मालवण तालुक्यातील प्रशिस्त रॉकगार्डन च्या धर्तीवर आचरे समुद्रकोनारी असे एखादे भव्य गार्डन, तसेच प्रत्येक दिवशी समुद्र किनारी फिरावयास येणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नाना नानी उद्यानाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व आपल्या प्रयत्नाने झाल्यास जनसामान्यासहीत बाहेरील पर्यटनासाठी आकर्षणाचा मानबिंदु ठरेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या सुप्रसिद्ध असे आचरा गांव पर्यटन नकाशावरील सुखसोयीतही अशा प्रकारच्या उद्यान व प्रकल्पामुळे अग्रेसर रहात विकसीत होत जाईल असा आचरावासियांनाही विश्वास असल्याचे समजते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)