ताज्या बातम्या
'दुकानदारांनो सावधान...!' नाणीज येथे जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते दसर्‍याच्या मुहूर्तावर 'सनातन पंचांग २०२७’ मराठी ॲपचे लोकार्पण.‘ श्री. दत्ता सामंत यांनी दिवंगत दामिनी पालव हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन. रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड. कसाल येथे १ नोव्हेंबर रोजी पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन. मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या ॲथलीटसची चमकदार कामगिरीसह जिल्हास्तरावर धडक..! मालवणात १८ ऑक्टोबर रोजी सकल हिंदू समाजातर्फे आयोजित ‘दुर्गा माता दौड' मध्ये सहभागाचे आवाहन. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कूलचे यश. कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन. कणकवलीत गिरिजा प्रभुदेसाई यांचा 'कथक' नृत्य वंदना कार्यक्रम.
'दुकानदारांनो सावधान...!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

'दुकानदारांनो सावधान...!'

'दुकानदारांनो सावधान...!'


ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक नितीन वाळके यांचा दुकानदारांना सावधगिरीचा इशारा.

Article image

मालवण : ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक तथा उद्योजक व माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी एका संदेशाद्वारे सावधगिरीचा इशारा दिला आहे. नितीन वाळके यांनी याबाबत, 'मेलिसा फर्नांडिस' असा डि. पी. तथा फोटो व नांव असलेल्या 08169829512 ह्या संपर्क क्रमांकावरून हॉटेल व्यवसायिकांना फोन येत आहेत असे स्पष्ट करत ती व्यक्ती 'फूड इन्स्पेक्टर शिंदे' बोलत असल्याचेही सांगत असल्याची माहिती दिली आहे.  


फोनवरून फूड इन्स्पेक्टर शिंदे असे सांगत असलेली व्यक्ती दुकानांमध्ये फूड लायसन लावले आहे की नाही याची विचारणा करत असून त्याबाबत प्रश्नाची कारणमीमांसा केली किंवा सकारात्मक उत्तर दिले तर ती व्यक्ती जास्त बोलू नये व दुकानात येऊन दुकानदारांवर कारवाई केली जाईल आणि तुमचे दुकान बंद करेन असे सांगून धमकावत आहे अशी माहिती ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक व उद्योजक नितीन वाळके यांनी संदेशाद्वारे दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स