ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
जिल्हा परिषद स्त्री  सदस्यांच्या राजस्थान दौऱ्यामुळे जिल्हा नियोजन समितीची सभा पुढे ढकलण्याची मागणी..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्हा परिषद स्त्री सदस्यांच्या राजस्थान दौऱ्यामुळे जिल्हा नियोजन समितीची सभा पुढे ढकलण्याची मागणी..!

प्रकाशन: 28 Oct 2021 12:47 AM
वाचन संख्या 37

जि.प.च्या महिला व बाल विकास सभापती शर्वाणी गांवकर यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे केली मागणी…

ब्युरो न्यूज | विवेक परब : सिंधुदुर्ग जि. प. च्या महिला व बाल विकास विभागा मार्फत 15 महिला जि. प. सदस्यांचा राजस्थान दौरा 8 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. मात्र 15 मधील 8 सदस्य हे जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत. व जिल्हा नियोजन समितीची सभा ९ नोव्हे. रोजी जाहिर झाली आहे. ही सभा पुढे ढकलण्याची मागणी जी प च्या महिला व बाल विकास सभापती शर्वाणी गांवकर यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे केली आहे.
जि. प. च्या १५ सदस्या राजस्थान दौऱ्यावर जात असल्याने सभा पुढे घेण्याची मागणी केली आहे सभापती शर्वाणी गांवकर यांनी केली आहे. महिला व बाल विकास विभागा मार्फत महिला जि.प.सदस्यांचा राजस्थान दौरा 8 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे 15 मधील 8 सदस्य हे जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत तसेच दौऱ्याचे नियोजनही झाले आहे त्यामुळे जिल्हा नियोजनची सभा 9 नोव्हेंबरला न घेता पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. महिला व बाल विकास सभापती शर्वणी गावकर यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांना दौरा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे
दरम्यान 28 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2021 ला जिल्हा नियोजनची सभा झाली होती. त्यानंतर आता 9 नोव्हेंबरला 9 महिन्या नंतर जिल्हा नियोजन समितीची सभा घेण्याचे निश्चित झाले आहे. परंतु आता सभा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आठवडाभर ही सभा लांबणीवर पडावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र प्रशासन व पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्व सदस्यांचे लक्ष आहेत

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स