ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नापणे धबधब्यावर काचेच्या पुलाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.

नापणे धबधब्यावर काचेच्या पुलाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.

प्रकाशन: 22 Jul 2025 07:11 PM
वाचन संख्या 917

सिंधुरत्न योजनेतून राज्यातील पहिला काचेचा पूल. 


वैभववाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्गातील नापणे धबधब्यावर सिंधुरत्न योजनेतून राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंगळवार, २२ जुलै रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. 

Article image


या पुलामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल. येत्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून नापणे धबधबा नावारुपाला येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धबधब्यावरील काचेच्या पुलाचा आनंद लुटावा पण शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची काळजी देखील घ्यावी, असे आवाहन यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. 


यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, वैभववाडी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, अरविंद रावराणे, नापणे सरपंच प्रदीप जैतापकर, नाधवडे सरपंच लीना पांचाळ, शेर्पे सरपंच सौ. पांचाळ, प्राची तावडे, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, बंड्या मांजरेकर, बाळा जठार, कार्यकारी अभियंता श्रीमती विना पुजारी, उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, माजी कार्यकारी अभियंता सर्वगोड, कनिष्ठ अभियंता शुभम दुडीये, ठेकेदार शशिकांत उर्फ राजू मुणगेकर, गणेश हळदीवे, ॲड.उमेश सावंत व पदाधिकारी, ग्रामस्थ, पर्यटक आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स