ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
राजकोट किल्ला शिवप्रेमी जनतेसाठी खुला करावा : व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर.

राजकोट किल्ला शिवप्रेमी जनतेसाठी खुला करावा : व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर.

प्रकाशन: 04 Oct 2024 04:26 PM
वाचन संख्या 115

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवपुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर राजकोट किल्ला पर्यटक, छत्रपती शिवप्रेमी तथा जनतेसाठी बंद करण्यात आला आहे. या विषयी पर्यटक व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांची भेट घेऊन राजकोट किल्ला पर्यटक व शिवप्रेमी साठी खुला करण्याची मागणी केली आहे. यावेळी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी सांगितले की १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला राजकोट किल्ला पूर्ण पणे नष्ट झालेला होता राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ऐतिहासिक राजकोट किल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्यात आला सर्व शिवप्रेमी साठी ही अभिमानास्पद बाब आहे. या राजकोट किल्ला उभारणी झाल्यावर पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सर्व शिवप्रेमी, जिल्हा प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील ३० गडकिल्ल्यावरील माती तसेच शिवनेरी व रायगड गडावरील माती कलश यात्रेच्या माध्यमातून भूमी कलश विधिवत पद्धतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून राजकोट किल्ल्यावर स्थापित केला आहे. सदर किल्यावर भारतीय नेव्हीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता जो कोसळून पडला आहे ही गोष्ट आम्हा शिवप्रेमींसाठी दुःखद आहे असे या निवेदनात नमूद केले आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाने निवेदनातून विनंती केली आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले गड किल्ले शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी असून राजकोट किल्लाही जलकोट साक्ष देणारा इतिहास असून त्या जागी नवीन शिवपुतळा उभारणीसाठी काही महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. तो पर्यंत राजकोट ऐतिहासिक किल्ला शिवप्रेमींच्या दर्शनासाठी बंद न ठेवता ज्या ठिकाणी सर्व गडकिल्याची माती स्थापित केलेल्या भूमी कलश स्थापित केला आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात छत्रपती शिवप्रतिमा (फोटो )स्थापित करून राजकोट किल्ला शिवप्रेमी साठी खुला करण्यात यावा अशी विनंती पर्यटन व्यावसायिक महासंघाने केली आहे.

यावर जिल्हाधिकारी यांनी या विषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी सांगितले अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी माध्यमांना दिली. यावेळी किशोर दाभोलकर सोशल मीडिया अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ, टी टी डी एस अध्यक्ष सहदेव साळगावकर, टीटीडीएस कार्याध्यक्ष रविंद्र खानविलकर, पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, मिलिंद झाड, रामा चोपेड़ेकर, मनोज खोबरेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स