ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अवैध सागवान लाकूड वाहतुकीवर वनविभागाची धडक कारवाई...!

अवैध सागवान लाकूड वाहतुकीवर वनविभागाची धडक कारवाई...!

प्रकाशन: 28 Oct 2021 12:14 AM
वाचन संख्या 96

साळगांव येथे विनापासी वाहतूक होत असताना केली कारवाई

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कुडाळ तालुक्यातील साळगांव येथे बुधवारी २६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.०० वाजताच्या सुमारास टाटा मॉडेल 2515 EX वाहन क्र. KA 28/8981 या कर्नाटक राज्यातील वाहनामधून साग इमारती लाकडाची विनापरवाना वाहतूक होत असताना वनविभागाने अटकाव करत तपासणी करून अवैध साग इमारती नग ११९/ ५१९ घनफुट माल जप्त करण्यात आल्याची माहिती कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली.
मौजे साळगाव ता. कुडाळ येथुन बेळगांवकडे वाहतूक होत असलेबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी इम्तियाज दस्तगीर मुजावर रा. चंदगड जि. कोल्हापूर याचेवर वनोपज लाकूड मालाची विनापरवाना विनापासी अवैध वाहतूक करून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (2ब), महाराष्ट्र वन नियमवाली २०१४ चे नियम ३१, ८२ चे उल्लंघन केलेने गुन्हा नोंद करणेत आला असून वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले वाहन व साग इमारती लाकूड माल जप्त करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, लाकूड मालाची विनापासी अवैध वाहतूक करणे भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये प्रतिबंधित असून अशा अवैध वाहतुकीकरिता २ वर्षे पर्यंतच्या कारावासाची तसेच द्रव्यदंडाचीही तरदूत करणेत आलेली आहे. अवैध लाकूड वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने धडक कारवाई सुरू केली असून असा अवैध प्रकार दिसून आल्यास वनविभागास कळविण्याचे आवाहनही करण्यात आले.


सदर कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी श्री. शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. आय. डी. जालगावकर व वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ श्री. अमृत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल माणगांव श्रीम. श्रेया परब , वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनरक्षक माणगाव बाळराजे जगताप,वनरक्षक वाडोस सुर्यकांत सावंत वनरक्षक नेरूर त हवेली सावळा कांबळे यांनी यशस्वी केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स