ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
चिपी विमानतळावरुन पुन्हा विमान झेपावणार ; खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश.

चिपी विमानतळावरुन पुन्हा विमान झेपावणार ; खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश.

प्रकाशन: 29 Nov 2024 09:14 PM
वाचन संख्या 288

पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळणार.

ब्यूरो न्यूज : चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांच्याकडे मागणी केली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग विमानतळामुळे होणाऱ्या सेवांकडेही मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले. सिंधुदुर्गला सेवा देणारी अलायन्स एअर सेवेचे आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याबाबत स्पष्ट भुमिकाही मांडली. यावेळी ही सेवा लवकरच सुरु करण्याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून कार्यवाही होईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री के. राम मोहन नायडू यांनी खासदार नारायण राणे यांना दिले. या भेटी दरम्यान खासदार नारायण राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा मूळ समुद्रकिनारे, विपुल नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक – धार्मिक स्थळे आणि विदेशी खाद्यपदार्थांसह पर्यटकांचे देशव्यापी तसेच आंतरराष्ट्रीय आवडते ठिकाण आहे. भारत सरकारने या पार्श्वभूमीवर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना आणि ‘उडान’मध्ये समाविष्ट करण्यासाठी सिंधुदुर्ग विमानतळाची निवड केली. अलायन्स एअरने मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई दरम्यान उड्डाणे सुरूही केली. त्यांच्याशी झालेल्या कराराचा कालावधी ३ वर्षांचा होता, जो ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे.

मुंबई – चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ ) अशी कार्यान्वित असलेली सेवा खूप चांगली होती. सणासुदीच्या काळात तसेच अन्य वेळीही मोठा फायदा प्रवाशांना आणि पर्यायाने कंपनीला होत असायचाच. हंगामाच्या वेळी तर एका मार्गासाठी २५ हजारापर्यंत तीकीट देऊन प्रवाशांनी प्रवास केला आहे. या दरम्यान कधीकधी हवामान , तसेच अन्य तांत्रीक कारणामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याने त्याचा फटका प्रवाशीसंख्येवरही झाला. परंतु फ्लाइट नेहमीच बुक केल्या गेल्या. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा त्वरीत कार्यरत व्हावी अशी मागणीही खासदार नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स