पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची २४ मे रोजी बैठक.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ही बैठक शनिवार दि. २४ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न होणार आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)