प्रवास टाळा…सतर्क रहा…सुरक्षित ठिकाणी रहा…!
आमदार निलेश राणे यांचे पावसाळी ऑरेंज अलर्ट पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन.
मालवण | ब्यूरो न्यूज : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. २३ व २४ मे रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे तसेच प्रवास टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा, असे आवाहन कुडाळ – मालवण मतदारसंघ आमदार निलेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आणि बचाव पथक तयार स्थितीत आहेत अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)