चौके माजी सरपंच राजा गावडे यांचा ठप्प झालेल्या दूरसंचार सेवेबाबत इशारा..!
मालवण | ब्यूरो न्यूज : चौके परिसरातील साळेल बीएसएनएल टॉवर माध्यमातून परिसरात दिली जाणारी सेवा तीन दिवस ठप्प आहे. मोबाईल सेवेसाठी बीएसएनएल सेवेवर अवलंबून असणाऱ्या लगतच्या गावातील ग्राहक व ग्रामस्थ यांना याचा फटका बसला आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी अशी मागणी चौके गावचे माजी सरपंच तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा अधिक दर्जेदार व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून नारायण राणे प्रयत्नशील आहेत. अनेक टॉवर त्यांनी मंजूर करून घेतले. जनतेला दर्जेदार सेवा मिळावी यासाठी नारायण राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. असे असताना संबंधित प्रशासनानेही गतिमान होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील सेवा काही समस्यांमुळे ठप्प होत असेल तर त्याबाबत त्वरित उपाययोजना गरजेच्या आहेत. चौके परिसरातील बीएसएनएल सेवा त्वरित सुरु करावी. अन्यथा नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, निलेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे राजा गावडे यांनी बीएसएनएल मालवण तालुका प्रशासनाला सूचित करताना सांगितले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)