ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
परब मराठा समाज सावंतवाडी तालुका संघटक म्हणून प्रविण परब यांची निवड...

परब मराठा समाज सावंतवाडी तालुका संघटक म्हणून प्रविण परब यांची निवड...

प्रकाशन: 28 Oct 2021 12:03 AM
वाचन संख्या 32

बांदा | राकेश परब : परब मराठा समाज मुंबई या संस्थेची सभा संस्थेचे मालवण तालुका संघटक जयेंद्रथ परब यांच्या अध्यक्षतेखाली मडुरा सोसायटी सभागृहात संपन्न झाली. यावेळी सावंतवाडी तालुका संघटक म्हणून प्रविण परब यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील परब मराठा समाज संस्थेशी जोडण्याबाबत सभेत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी व्यासपीठावर मालवण तालुका संघटक जयेंद्रथ परब, मडुरा देवस्थान समिती अध्यक्ष आनंद परब, सोसायटी चेअरमन संतोष परब, समीर परब उपस्थित होते. यावेळी जयेंद्रथ परब यांनी परब मराठा संस्थेची विस्तृतपणे माहिती दिली. जिल्ह्यात समाजबांधव विखुरलेला असून सर्वांना संस्थेत समाविष्ट करण्याबाबत मार्गदर्शन केले.
परब को-आँपरेटिव्ह सोसायटी लि. मुंबई या पतसंस्थेच्या कार्याबाबतही त्यांनी माहिती दिली. कणकवली व कुडाळ तालुक्यात पतसंस्थेच्या शाखा कार्यान्वित असून सावंतवाडी तालुक्यात ५०० सभासद नोंदणी झाल्यानंतर पतसंस्थेची शाखा करण्याचे अभिवचनही त्यांनी दिले. यावेळी समीर परब यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी सुनील परब, नारायण परब, दिलीप परब, शंकर परब, विजय परब, जगन्नाथ परब, नकुल परब, सोमनाथ परब, हिराजी परब, दत्ताराम परब, अरुण परब, संतोष परब, शांताराम परब, दिनेश परब, बाबली परब, शशिकांत परब, अनंत परब, उल्हास परब, प्रविण ज. परब, पिंटो परब, सुभाष परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सुनील परब, स्वागत सोमनाथ परब तर आभार चेअरमन संतोष परब यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स