ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कुडाळ बस स्थानक व आगार समस्यांविषयी आढावा बैठक.

कुडाळ बस स्थानक व आगार समस्यांविषयी आढावा बैठक.

प्रकाशन: 21 May 2025 09:21 PM
वाचन संख्या 125

आ. निलेश राणेंच्या अध्यक्षतेखाली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा.

कुडाळ | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली. यावेळी सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कुडाळ बस स्थानक व आगारातील दुरवस्थेबाबत तसेच दररोज उशिरा सुटणाऱ्या गाडया तसेच अचानक गाडया रद्द होण्याचे वाढलेले प्रमाण याबाबत सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी आमदार निलेश राणे यांनी वासुदेवानंद सभागृह कुडाळ येथे झालेल्या आढावा बैठकीत चर्चा केली. तसेच कुडाळ स्थानकावरील नवीन बसस्थानक इमारत बांधताना आराखड्यातील तांत्रिक चुकांमुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणेंचे लक्ष वेधले. या तांत्रिक चुका दुरुस्त करण्याबाबत वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आमदार निलेश राणे यांनी आश्वासन दिले.

कुडाळ आगाराला एस.टी प्रशासनाकडून सीएनजी बसेस दिल्यामुळे वाहतूक कोलमडलेली असल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सुजित डोंगरे यांनी वस्तुस्थिती सत्य असल्याचे सांगत सीएनजी बसेस झाराप पंपावर भरण्यासाठी जात असल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत येत्या दोन ते तीन दिवसात कुडाळ आगारातील जागा सीएनजी पंपासाठी देण्यात येणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यात आगारातील पंप सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. कुडाळ बसस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या एस.टी बसेसचे प्रमाण पाहता प्रवाशांसाठी असलेली बैठक व्यवस्था अपुरी असून स्थानकाचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने असल्याचे रोशन तेंडोलकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणले. आमदार निलेश राणे यांनी याबाबत एसटी प्रशासनाकडून मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कुडाळ आगाराला नवीन बसेस न मिळाल्याबाबत सांगितले असता परिवहन मंत्र्यांशी भेट ठरवून लवकरात लवकर कुडाळ आगाराला दहा बसेस उपलब्ध करून देण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले. जुन्या कुडाळ एसटी बस स्थानकात पोलीस चौकी होती तशाच प्रकारची पोलीस चौकी स्थानकात असावी अशी मागणी करण्यात आली. आमदार निलेश राणे यांनी यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. तसेच कुडाळ आगाराला आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन येत्या काही दिवसात प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे सांगून त्यांनी सेवाशक्ती संघर्ष कर्मचारी संघांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. यावेळी शक्ती संघर्ष कर्मचारी संघ कुडाळ शाखेच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा शाल, पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे केंद्रीय नेतृत्व रोशन तेंडुलकर, सचिव भरत चव्हाण, कुडाळ आगार अध्यक्ष दादा साईल, कार्याध्यक्ष सुनील बांदेकर, प्रशांत गावडे, संजय हुमरमळेकर, आगार सचिव मिथुन बांबुळकर, महेश तावडे, निलेश कसालकर तसेच परिवहन महामंडळाचे कार्यशाळा यंत्र अभियंता सुजित डोंगरे, वाहतूक अधीक्षक निलेश लाड उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स