ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भरतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे यांच्यावतीने मसुरे केंद्र बल गटातल्या इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव.

भरतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे यांच्यावतीने मसुरे केंद्र बल गटातल्या इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव.

प्रकाशन: 21 May 2025 10:08 PM
वाचन संख्या 178

कामगार नेते प्रकाश परब यांची उपस्थिती.

मसुरे | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी तन मन धन अर्पण करून शिक्षण घेतल्यास यश निश्चितच मिळते. झुंजार कामगार नेते जयवंत परब यांनी या इंग्रजी माध्यम प्रशालेचे रोपटे लावले. आपल्या ग्रामीण भागातील मुले भविष्यात इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजेत अशा त्यांच्या विचारांना यापुढे सुद्धा मी पुढे नेणार आहे. भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेचा शैक्षणिक आलेख नियमित उंचावलेला असून यापुढे सुद्धा मी सदैव तुमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे मत कामगार नेते आणि माता काशीबाई महादेव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश परब यांनी मसुरे येथे बोलताना व्यक्त केले.

माता काशीबाई महादेव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आणि भरतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे यांच्यावतीने मसुरे केंद्र बल गटातील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ज्येष्ठ कामगार नेते कै. जयवंत परब यांच्या जयंतीचे औचित्य साधून भरतगड इंग्लिश मीडियम सभागृहामध्ये कामगार नेते प्रकाश परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी मसुरे केंद्रामधील आणि भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या प्रशालेतील गुणवंत शिक्षकांचाही गौरव मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात जयवंत परब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले, आर पी बागवे हायस्कूलचे शाळा समिती अध्यक्ष राजन परब, माजी सरपंच संदीप हडकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विना मेहंदळे मॅडम, माजी मुख्याध्यापक किशोर देवूलकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर, बापू मसुरेकर, संतोष सावंत, केशव भोगले, ठाकूर मॅडम, सायली म्हाडगुत, सिद्धी मेस्त्री, वसंत प्रभूगावकर, स्वरा चव्हाण, सौ रेशमा बोरकर पेडणेकर, सौ पार्वती कोदे, सौ गौतमी प्रभू गावकर, सौ सविता मेस्त्री, सौ स्टेला लोबो, स्वरांजली ठाकूर, समीर गोसावी, तनुश्री नाबर, रसिका मेस्त्री, श्रुतिका लाड, विभावरी पराडकर, समीर सावंत, बबन धारगळकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, संस्था सभासद, आजी – माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विविध मान्यवरांनी इंग्लिश मीडियम च्या जडणघडणीबाबत आणि कामगार नेते जयवंत परब यांच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रकाश परब यांनी प्रतिकूल परिस्थितीतही ही संस्था शैक्षणिक योगदानाचे कार्य करत असून यासाठी यापुढे सर्वांनी एक दिलाने सहकार्य करण्याचे आवाहनही केले. यावेळी संस्कृती मसुरेकर, मानस धरगळकर, श्रावणी पालव, धृती भोगले, परब यांचा विशेष गौरव करण्यात आला. उपस्थित पालक वर्गातून महेश मुळीक यांनी वैयक्तिक गणित व विज्ञान विषयात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली म्हाडगुत व सिद्धी मेस्त्री यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स