कुडाळ येथे उमेद महिला मेळावा आणि अवजार वाटप सोहळा संपन्न.
आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.
दहा ग्राम संघांना ५० लाखांचे शेतीपूरक साहित्य वितरित.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या वतीने बुधवार, २१ मे रोजी वासुदेवानंद हॉल कुडाळ येथे उमेद महिला मेळावा आणि अवजार वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
महिला वर्गासाठी शेतीपूरक व बिगर शेती बाबत ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ हा तळागाळात पोचला पाहिजे. शासनाच्या दरबारी प्रस्ताव पाठवताना प्रस्तावांचा धबधबा असला पाहिजे. सर्वाधिक निधी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसा येईल, यासाठी प्रशासनाने तत्पर राहिले पाहिजे. ग्रामीण भागातील ज्या महिला या योजनेमधून वंचित आहेत, त्या शोधून त्यांना लाभ कसा देता येईल, यासाठी अधिकारी वर्ग ग्रामीण भागात पोचले पाहिजेत, असे प्रतिपादन कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी उमेद महिला मेळाव्यात केले. यावेळी अवजार बँक मधून कुडाळ तालुक्यातील दहा ग्राम संघांना ५० लाख रुपयांचे शेतीपूरक साहित्याचे वितरण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
माणगाव प्रभाग समन्वयक हेमंत मेस्त्री, आंब्रड ओरोसच्या मनीषा कांबळी, पिंगुळी तेंडोली सुप्रिया वालावलकर, वेताळबांबर्डे पावशी ज्योस्त्रा जाधव, घावनळे नितीन गावडे, सामुदायिक कृषी व्यवस्थापक रसिका राणे यांचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अवजार बँक मधून कुडाळ तालुक्यातील दहा ग्राम संघांना ५० लाख रुपयांचे शेतीपूरक साहित्याचे वितरण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सावली ग्राम संघ साळगाव, आधार ग्रामसंघ ओरोस, प्रगती ग्राम संघ आंबेरी, महिला शक्ती ग्रामसंघ मांडकुली, प्रगती ग्रामसंघ कुसबे, स्वराज्य ग्रामसंघ पडवे, सावित्रीबाई ग्रामसंघ आंब्रड वैष्णवी ग्राम संघ केरवडे क नारुर, हिरकणी ग्रामसंघ पिंगुळी, क्रांती ग्रामसंघ भडगाव यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निलेश गुरव यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिप्ती पडते, पणदूर माजी सरपंच दादा साईल, प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, अभियान व्यवस्थापक वैभव पवार, तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड, निलेश तेंडोलकर, राकेश कांदे, नेरुर-प्रभागसंघ अध्यक्ष सोनाली चव्हाण, पिंगुळी-प्रभाग संघ अध्यक्ष साधना माडये, तेडोली-प्रभागसंघ अध्यक्ष श्रेया मोर्ये, पावशी प्रभागसंघ अध्यक्ष सुनिधी सावंत, वेताळबांबर्डे-प्रभागसंघ अध्यक्ष रोहिणी कुपेरकर, माणगाव-प्रभागसंघ अध्यक्ष शबनम नाईक, आंब्रड-प्रभागसंघ अध्यक्ष प्राची दळवी, ओरोस प्रभाग संघ अध्यक्ष साक्षी गोसावी, तसेच उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना अध्यक्ष उषा नेरुरकर, उपाध्यक्ष सोनाली सावंत, सचिव रंजना मेस्त्री, राणे आणि कुडाळ तालुक्यातून नऊही प्रभाग संघातील सीआरपी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)