ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सिंधुदुर्गात दहावी - बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा २२ मे रोजी सत्कार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्गात दहावी - बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा २२ मे रोजी सत्कार.

प्रकाशन: 21 May 2025 05:51 PM
वाचन संख्या 182

पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गुणगौरव.

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेमधील कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुका स्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. हा गौरव समारंभ गुरुवार दि २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दुपारी २ वाजता पार पडणार आहे.

इयत्ता १० वी मध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मधील कु. आर्या अजित राणे आणि कु. श्रेयस चंद्रशेखर बर्वे आणि कुडाळ हायस्कूल मधील कु. चैतन्या रुपेश सावंत या तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्मितेश कडुलकर, रेश्मा पालव, विधी चिंदरकर, ध्रुव तेंडुलकर, हर्षदा हडलगेकर या पाच विद्यार्थ्यांनी ९९.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर नक्षत्रा राजेंद्र काळे या विद्यार्थीनीने ९९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

तसेच इयत्ता बारावी मधील विज्ञान शाखेतील जाधव अथर्व अतुल, तेंडुलकर मधुकर विवेक, पालव काशीराम विठोबा, कला शाखेतील दळवी तनिषा विनय, कोकरे प्रियंका प्रकाश, मांजरेकर मानसी पांडुरंग तर वाणिज्य शाखेतील भोगटे आयुषी रुपेश, वाळुंजे चित्राली राजेश, तनुज निलेश या विद्यार्थ्यांना देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत कोकण विभागामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना देखील पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स