वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम गतीमान रित्या सुरू…!
आमदार निलेश राणे सातत्याने संपर्कात.
उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांची माहिती.
मालवण | प्रतिनिधी : वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे मालवणसह अनेक भागांत नुकसान झाले. वीज खांब व तारा तुटून नुकसान झाले. सबस्टेशन मालवण, आचरा, कुंभारमाठ, पेंडुर या माध्यमातून होणारा वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम एम एस इ बी मार्फत, गतिमान रित्या सुरु आहे. आमदार निलेश राणे सातत्याने संपर्कात असल्याचे मालवण उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांनी सांगितले.
दरम्यान, काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तसेच संततधार पाऊस यामुळे कामात अडथळा निर्माण होत होता. तळेबाजार, आचरा सबस्टेशनं मार्गे येणारा पुरवठा सुरु होत आहे. कुडाळ येथून येणाऱ्या मार्गांवर वीज खांब कोसळून व तारा तुटून मोठे नुकसान झाले. तेही पूर्ण करण्याचे काम प्रगतीत आहे. एम एस इ बी कडून काम सुरु असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे सचिन म्हेत्रे यांनी सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)