ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
त्रिंबक येथे १५ मे रोजी अमृत सन्मान सोहळा.

त्रिंबक येथे १५ मे रोजी अमृत सन्मान सोहळा.

प्रकाशन: 12 May 2025 05:54 PM
वाचन संख्या 91

कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती.

जागृत उन्नती मंडळ त्रिंबक यांचे उपस्थितीचे आवाहन.

आचरा | प्रतिनिधी : जागृत उन्नती मंडळ त्रिंबकचा अमृत सन्मान सोहळा, १५ मे रोजी जनता विद्यामंदिर त्रिंबक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्रिंबक गाव विकासाचा ध्यास सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठीच आणि गावातील सर्व सेवार्थिंचा, ७५ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान करुन त्यांचे आशिर्वाद घेऊन भविष्यातील कामांचा आरंभ करावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती जागृत उन्नती मंडळ त्रिंबक – मुंबई अध्यक्ष दत्ता पवार यांनी त्रिंबक येथे आयोजित बैठकीत दिली.

यावेळी त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, मुंबई समिती कार्याध्यक्ष चेतन साटम, सचिव अरविंद कदम, कोषाध्यक्ष संतोष त्रिंबककर, स्थानिक समितीचे अध्यक्ष यशवंत बागवे, सचिव उदय मेहंदळे, कोषाध्यक्ष श्रीमती पुजा सुतार तसेच मार्गदर्शक सुरेंद्र सकपाळ, सुधाकर त्रिंबककर, दिनेश त्रिंबककर, अनिल कदम, श्रीमती दिपा केरकर, योगेश साटम, पोलीस पाटील सिताराम सकपाळ यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट करताना पवार यांनी सांगितले की कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी १५ मे रोजी सकाळी ७:३० वाजता सत्यनारायण महापूजेने होणार आहे. सकाळी ९:३० वाजता गाडगीळ गुरुजी वाचनालय येथून मंदार सकपाळ यांच्या ढोलपथकाच्या सहाय्याने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. १०:३० वाजता अमृत सन्मान सोहळा होणार आहे. यात त्रिंबक गावातील जेष्ठ नागरिक, बाळंतपण काढणा-या सुईनीचा कृतज्ञता सन्मान, कोरोनात काम करणारे डॉक्टर, वैदू आदी मिळून १५५ जणांचा सन्मान केला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

या सोहळ्यात दुपारी स्नेह भोजनानंतर सायंकाळी ५:३० वाजता स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम तर संध्याकाळी ६:३० वाजता चंद्रकांत साटम मुंबई यांचा शिवदर्शन हा कार्यक्रम होणार आहे. जागृत उन्नती मंडळ त्रिंबक यांच्या कडून उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स