ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थिती.

पालकमंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थिती.

प्रकाशन: 13 May 2025 10:21 AM
वाचन संख्या 49

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार भवनात, १२ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, गावच्या शेवटच्या घटकापर्यंत व सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचविणारा ग्रामपंचायत कर्मचारी हा शासनातील महत्त्वाचा दुवा आहे. गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन अध्यक्ष यांसह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स