ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय संरक्षण दलाचे केले अभिनंदन.

पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय संरक्षण दलाचे केले अभिनंदन.

प्रकाशन: 09 May 2025 07:59 PM
वाचन संख्या 74

मच्छिमारांना केंद्र व राज्य सरकारच्या नियमांचे तंतोतत पालन करायचे आवाहन.

नियमांच्या चौकटीत राहून तिरंगा रॅली अथवा अन्य कार्यक्रम करायचे असतील तर प्रोत्साहन देणार असल्याची माहिती.

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : एका पत्रकार परिषदे द्वारा जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे यांनी भारतीय संरक्षण दलाचे अभिनंदन केले. केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या येणाऱ्या आव्हानांचे, सूचनांचे व नियमांचे पालन नागरिकांनी केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सैन्यातील कोणत्याही व्यक्तीच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी कोणतीही बाब समाज माध्यमांमधून होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. रक्तदान शिबिरांमध्ये सहभाग घेऊन नागरिकांनी आपले योगदान द्यावे आणि नियमांच्या चौकटीत राहून तिरंगा रॅली अथवा अन्य कार्यक्रम करायचे असतील तर जिल्हा प्रशासनाकडून प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले.

किनारपट्टीवरील मच्छीमारांनी केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करावे. ‘आपले सैन्य अभिमान वाटावा अस काम करतेय त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम शब्दापलीकडे जाऊन कृतीतून करावं’ असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स