ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आम्ही मदतीला तयार..!

आम्ही मदतीला तयार..!

प्रकाशन: 07 May 2025 11:11 AM
वाचन संख्या 42

मालवणात बजरंग दलाच्या वतीने पोलीसांना निवेदन.

मालवण | प्रतिनिधी : युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास शासन जे काही निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेतील किंवा शासनास नागरिकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवायच्या असतील किंवा सामाजिक कार्य करावयाचे असेल तर अशावेळी बजरंग दल शासनास सर्वतोपरी मदतीस तत्पर आहे. याबाबत निवेदन विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल शाखा मालवण यांच्या वतीने पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे.

यावेळी भाऊ सामंत, श्रीराज बादेकर, अनिकेत फाटक, प्रसाद हळदणकर, गणेश चव्हाण, हरेश पडते, मुकुंद घाडी, स्वप्नील घाडी, पार्थ डिचवलकर, सचिन वराडकर आदी उपस्थित होते.

पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्ही बजरंग दल शाखा मालवणच्या वतीने आपणांस सांगू इच्छितो, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी कशाप्रकारे सतर्क रहावे यासाठी मॉक ड्रिल आयोजित केलेले आहे. या मॉक ड्रिल साठी बजरंग दल शाखा मालवण तर्फे आपणास काही सहकार्य लागल्यास कृपया तसे आम्हास कळवावे. आमचे कार्यकर्ते सर्वतोपरी आपल्या सहकार्यासाठी नेहमी उपस्थित असतील. तसेच पुढील काळात जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास शासन जे काही निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेतील किंवा शासनास नागरिकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवायच्या असतील किंवा सामाजिक कार्य करावयाचे असेल तर अशावेळी बजरंग दल शासनास सर्वतोपरी मदतीस तत्पर राहील.

शासनास काही सहकार्य लागल्यास बजरंग दल शाखा मालवण च्या कार्यकर्त्यांना माहिती द्यावी. आम्ही शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हास जमेल तेवढे सहकार्य करण्यास तयार आहोत असे या निवेदनात स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स