ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थांचे मंत्री आशिष शेलार यांचे सहकुटुंब दर्शन.

वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थांचे मंत्री आशिष शेलार यांचे सहकुटुंब दर्शन.

प्रकाशन: 30 Apr 2025 05:16 PM
वाचन संख्या 47

अक्कलकोट | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरातील प्रसन्न वातावरण आपणास नेहमीच प्रफ्फुलीत वाटते. या प्रसन्न वातावरणामुळे मनात स्वामीमय भक्तीचा आनंद तरळतो, त्यामुळे स्वामी दर्शनाची आस नेहमी लागणे साहजिकच आहे. अशा या स्वामी समर्थांच्या जागृत स्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरास भाविकांनी वेळोवेळी भेट देऊन नेहमीच स्वामी दर्शन घेऊन वटवृक्ष मंदिरातील प्रसन्नतेचा भाविकांनी नेहमी लाभ घ्यावा असे मनोगत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक प्रौद्योगिक मंत्री व बांद्रा मुंबई विधानसभा मतदार संघाचे आ.आशिष शेलार यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी आशिष शेलार यांचा सपत्निक स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार केला यावेळी आशिष शेलार बोलत होते.

यावेळी प्रथमेश इंगळे, नरेंद्र हेटे, अमेय हेटे, मंजिरी हेटे, मा.नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, नन्नू कोरबू, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे,
दर्शन घाटगे, धनराज स्वामी, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, अविनाश क्षीर, प्रसाद सोनार, गोंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स