ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री - फेज लाईनच्या एकूण ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर व थ्री - फेज लाईनच्या एकूण ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान.

प्रकाशन: 06 Apr 2025 02:01 PM
वाचन संख्या 88

आ. निलेश राणे यांचे वीज यंत्रणा सक्षमतेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न.

कुडाळ | ब्यूरो न्यूज : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मर, लाईन शिफ्टिंग व लाईन थ्री – फेज करणे या एकूण ११ कामांसाठी ८० लाख रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आमदार निलेश राणे यांनी या निधी उपलब्ध करून देत मतदारसंघात महत्वाच्या आणि अनेक वर्षांची मागणी आलेल्या कामांसाठी मंजुरी दिली आहे.

या कामांमध्ये नांदोस गिरेश्वर मंदिर ते लिंगेश्वर मंदिर रस्त्यावर LT लाईन श्री फेज करणे, नेरूर कुलस्वामिनी मंदिर येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, पावशी सिमावाडी कुंभार वाडी येथे १०० kV ट्रान्सफॉर्मर बसविणे, माड्याचीवाडी (मडगाव) पोलीस चेक पोस्ट नजीक ट्रान्सफॉर्मर बसविणे, बांबार्डे पावणाईटेंब सावंत पार्क १०० kV ट्रान्सफॉर्मर करणे, आंबेरी माणगाव मडाचा उंचावला गावातील खराब झालेल्या ११ kv लाईनची बदली व दुरुस्ती करणे, जांभवडे कुंभारवाडी व भंडारवाडी येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर व ११ KV लाईन करणे, झाराप मुंडयेवादी येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, निरुखे नाईकवाडी येथे थ्रि फेस लाईन करणे. या कामांचा समावेश आहे.

पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणार असून अत्यंत तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचे नांदोस, नेरूर, पावशी, माड्याचीवाडी, आंबेरी, जांभवडे, बांबर्डे ग्रामस्थांनी तसेच महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स