सौ. हर्षदा गजानन बांदेकर यांचे निधन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील कुमार काॅम्प्लेक्स, भरड येथील रहिवासी सौ. हर्षदा गजानन बांदेकर (६३ वर्षे ) यांचे रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व कन्या असा परिवार आहे.
राज्य परीवहन महामंडळाचे निवृत्त चालक श्री. गजानन बांदेकर यांच्या त्या पत्नी होत. सौ. हर्षदा गजानन बांदेकर यांच्यावर दांडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)