पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते ६ एप्रिल रोजी 'येतंव' ॲपचे लोकार्पण.
मालवण | ब्यूरो न्यूज : सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या प्रयत्नाने आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून झॅपॲप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विकसित केलेल्या ‘येतंव’ या स्थानिक प्रवासी पर्यटक व ऑटो रिक्षा वाहन चालक यांचा दुवा म्हणून काम करणाऱ्या मोबाईल ॲपचे लोकार्पण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते ६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत भरड येथील मालवण हेरिटेज येथे होणार आहे.
या कार्यक्रमास महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, मालवण तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर आदी उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)