ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
व्हॉइस ऑफ मीडिया, सिंधुदुर्ग नूतन जिल्हा कार्यकारिणी.

व्हॉइस ऑफ मीडिया, सिंधुदुर्ग नूतन जिल्हा कार्यकारिणी.

प्रकाशन: 09 Mar 2025 03:40 PM
वाचन संख्या 289

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : ५१ देशांमध्ये पत्रकार बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारी कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे संपन्न झालेल्या सभेत प्रा. पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली.

सन २०२५ ते २०२७ या दोन वर्षांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ जिल्हा सिंधुदुर्ग कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे.

प्रा. रुपेश पाटील (अध्यक्ष), अनंत धोंड (कार्याध्यक्ष), भूषण सावंत – कार्याध्यक्ष, शैलेश मयेकर (सचिव), संजय पिळणकर (सहसचिव), अमित पालव ( उपाध्यक्ष), मिलिंद धुरी – (उपाध्यक्ष), विष्णू धावडे (उपाध्यक्ष), आनंद कांडरकर – (खजिनदार), समीर महाडेश्वर – (संघटक), सीताराम गावडे- ( सल्लागार), राजेश नाईक (सल्लागार), बाळकृष्ण खरात (सल्लागार), दीपक पटेकर (प्रसिद्धी प्रमुख), परेश राऊत ( सदस्य), विद्या बांदेकर (सदस्य), चिन्मय घोगळे ( सदस्य), राजेंद्र दळवी (सदस्य), नागेश दुखंडे ( सदस्य), प्रथमेश गवस (सदस्य), विवेक परब ( सदस्य ).

यावेळी सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून सिद्धेश सावंत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 

आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार बांधवांची एक चांगली संघटनात्मक बांधणी करून सकारात्मक पत्रकारितेच्या दृष्टीकोनातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स