आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदार संघासह जिल्ह्यात विविध उपक्रम आखण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. दत्ता सामंत यांनी दिली. कुंभारमाठ, मालवण येथे आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी ही माहिती दिली. अधिवेशन कालावधीमुळे आ. निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्च ऐवजी १६ मार्चला साजरा केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या सह महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित रहाणार असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.
वाढदिवसाचे औचित्य साधुन, बोर्डिंग ग्राउंड, मालवण येथे १६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता ‘शिवायन’ हे महानाट्य सादर होईल. छत्रपती शिवरायांवर आधारीत हे महानाट्य ग्रामीण भागातील शेतकरी, महिला यांना पहाता यावे यासाठी त्यांना नाट्यस्थळी आणण्याची सोय केली गेली आहे. वाढदिवसाचे औचित्य साधुन एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि ज्या जिल्हा परीषद शाळांची पटसंख्या ५० हून अधिक आहे अशा साडेतिनशे ते चारशे जिल्हा परीषद शाळांमध्ये वैद्यकीय संच ( मेडिकल कीट ) वाटण्यात येणार असल्याची माहिती श्री. दत्ता सामंत यांनी दिली.
या पत्रकार परीषदे वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, महेश राणे, संतोष साटविलकर, पराग खोत, बाळू नाटेकर, अशोक बागवे, आनंद खवणेकर, अरुण तोडणकर, श्री. खवणेकर, अरविंद साटम, निलेश बाईत, विनोद साटम, विनायक बाईत व पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांचा १७ मार्च रोजी वाढदिवस असून तो १६ मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)