ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन स्पर्धेत उतरले पाहिजे : वैभव नाईक.

विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन स्पर्धेत उतरले पाहिजे : वैभव नाईक.

प्रकाशन: 04 Jan 2025 02:11 PM
वाचन संख्या 104

सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभात माजी आमदार वैभव नाईक यांचे मार्गदर्शन व सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही.

प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही जगाच्या पाठीवर आपली छाप उमटवली आहे. सह्याद्री माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. या विद्यालयातून ज्ञानार्जनाचे कार्य उत्तम प्रकारे होत आहे.आता प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली असल्याने विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन स्पर्धेत उतरले पाहिजे. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आम्ही करू अशी ग्वाही माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली.

कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु. या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन चव्हाण तर माजी आमदार वैभव नाईक यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सायंकाळी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडले.

यावेळी संस्थाध्यक्ष चंद्रशेखर सावंत, संस्था सचिव संभाजी वळंजू, मुख्याध्यापक सचिन धुरी, संदीप सावंत, चंद्रहास सावंत, वर्दे सरपंच महादेव पालव, लालू सावंत, अतुल कल्याणकर, अरुण माळकर, विद्याधर मुंज,अमित कल्याणकर, किरण गावकर, सहाय्यक शिक्षक सतीश वारंग, रामचंद्र पिकुळकर, माधुरी खराडे, सुप्रिया बांदेकर, आदिती परब, कविता राऊत, राजेंद्र सावंत, लक्ष्मण बावदाने, लक्ष्मण लोट, कु. भार्गव सावंत, कु. रेणुका खरात, कु. आर्या कल्याणकर यांसह संस्थेचे पदाधिकारी, पांग्रड शाळेचे मुख्याध्यापक, भडगाव बु. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स