ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मळगाव ग्रंथालयात महिला गीत गायन कार्यक्रम संपन्न.

मळगाव ग्रंथालयात महिला गीत गायन कार्यक्रम संपन्न.

प्रकाशन: 04 Jan 2025 01:55 PM
वाचन संख्या 58

मळगाव | प्रतिनिधी : मळगाव येथील कै प्रा उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित स्व. सौ. उषा प्रकाश पाणदरे स्मृती प्रित्यर्थ श्री. प्रकाश पाणदरे पुरस्कृत ‘स्वरसंध्या’ हा महिलांसाठीचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. महेश खानोलकर, प्रमुख अतिथी श्री प्रकाश पाणदरे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदक श्री. शेखर पाडगांवकर होते.

मान्यवरांचे ग्रंथालयातर्फे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि श्री. प्रकाश पाणदरे यांनी आपल्या पत्नीला गायनाची विशेष आवड होती पण तिची गायन कला समाजा समोर आली नाही. मात्र मळगावच्या ग्रंथालयाने तिच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रंथालयात गावातील महिला, माता, भगिनीसाठी, ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाद्वारे महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याबदल संस्थेचे कौतुक केले. यापुढेही मी या संस्थेच्या पाठीशी उभा राहून सदैव आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

या ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमात कु. मधुरा खानोलकर कु. मुग्धा पंतवालावलकर, सौ. स्नेहा खानोलकर, सौ. दिपाली खानोलकर, सौ. उमा पंतवालावलकर, सौ. गौरी पाटकर, सौ. संगीता राऊळ, सौ. गौरी कुडव, सौ. प्राजक्ता नाईक, सौ. स्नेहल जामदार, कु. ऋजुता भागवत, कु. सलोनी गावकर, सौ राधिका कातळकर आदिनी आपल्या आवडीची गीते सादर केली. उपस्थित रसिक श्रोत्यांमधून श्रीमती चेतना दाभोलकर, सौ. प्रतिमा पडवळ या दोन चोखंदळ रसिक श्रोत्यांची निवड कार्यक्रमाचे निवेदक यांनी केली. त्यांना रोख पारितोषिक देवून त्यांचा गौरव केला. कार्यक्रमाला श्री. गोविद मळगांवकर तसेच श्री. प्रणित गोसावी यांची संगीत साथ लाभली. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन आबा सावळ यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री. पृथ्वीराज बांधेकर यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन श्री. शेखर पाडगांवकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक, ग्रामस्थ, ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स