ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
लायन्स फेस्टीव्हल मध्ये तन्वी कदमचा सत्कार.

लायन्स फेस्टीव्हल मध्ये तन्वी कदमचा सत्कार.

प्रकाशन: 02 Jan 2025 03:11 PM
वाचन संख्या 46

चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत तन्वी कदम हिचे उल्लेखनीय यश.

मसुरे | प्रतिनिधी : लायन्स क्लब कुडाळ आयोजित कुडाळ हायस्कूलच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेल्या लायन्स फेस्टीव्हल कार्यक्रमात कसाल येथील उद्योजक संतोष कदम व डॉ श्रेया कदम यांची कन्या तन्वी कदम हिचा सत्कार करण्यात आला. तन्वी हिने चार्टर्ड अकाउंटंट या देशपातळीवरील व्यावसायिक परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळविलेल्या यशाबद्दल लायन्स क्लब, सारस्वत बँक, लायन सेवा संकुल आणि चार्टर्ड अकांऊटंट असोसिएशन यांचे वतीने सारस्वत बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री अनिल आंबेस्कर व ज्येष्ठ सीए अजित फाटक यांचे हस्ते पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देवून खास सत्कार करण्यात आला. यावेळी सारस्वत बँकेचे संचालक जेष्ठ सीए सुनील सौदागर यांनी खास मालवणी भाषेत घेतलेल्या मुलाखतीत तन्वी हिने मालवणी बोलीभाषेच्या खास शैलीत उत्तर देताना सांगितले की क्षेत्र कोणतेही असो, जिद्द, चिकाटी, मेहनत ,सातत्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास यावर ते अधोरेखित करता येते.आणि यावरच मी हे यश मिळविले आहे. भविष्यात याहूनही या क्षेत्रातील मोठे यश मिळवून मी सिंधुदूर्ग जिल्ह्याचा नाव उंचावर नेऊन पुन्हा एकदा अशा सत्कारास पात्र ठरेन असे सांगितले.

यावेळी उद्योजक संतोष कदम, डॉ श्रेया कदम,अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, ॲड अमोल सामंत, ॲड अजित भणगे, श्रीनिवास नाईक, गणेश म्हाडदळकर, सीए सागर तेली सारस्वत बँक कुडाळ शाखाधिकारी योगेश ठाकूर आणि लायन्स क्लब चे पदाधिकारी आणि सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स