ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
युवा बुवांनी पंचम स्वरसम्राट व भजनकार गुरूवर्य विजय परब यांच्यासारख्या रत्नाचा आदर्श ठेवून शिकावे : दत्ता सामंत.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

युवा बुवांनी पंचम स्वरसम्राट व भजनकार गुरूवर्य विजय परब यांच्यासारख्या रत्नाचा आदर्श ठेवून शिकावे : दत्ता सामंत.

प्रकाशन: 02 Jan 2025 02:03 PM
वाचन संख्या 80

प्रतिनिधी : युवा बुवांनी पंचम स्वरसम्राट व भजनकार गुरूवर्य विजय परब यांचा आदर्श ठेवावा व अशा रत्नाकडून शिकवण घ्यावी असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कासार्डे येथे केले. कासार्डे कराळे हाॅल येथे आयोजीत पंचम स्वरसम्राट व भजनकार विजय परब यांच्या (७५ व्या ) अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. बुधवार १ जानेवारी २०२४ रोजी गुरूवर्य विजय परब यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थित राहून गुरुवर्य परब बुवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह श्रीधर मुणगेकर, रामदास कासले, प्रमोद हरयाण, बुवा भालचंद्र केळुस्कर, चिले बुवा, प्रकाश पारकर, पाळेकर बुवा, शिरसाठ बुवा, लक्ष्मण गुरव, गुंडू सावंत, लोके बुवा तसेच भजन क्षेत्रातील दिग्गज, व गुरूवर्य विजय परब बुवांचे शिष्य आणि भजनप्रेमी चाहते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स