ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खाजगी बसधारकांनाही 27 ऑक्टोबरपासून 'ट्वेंटी ट्वेंटी' शिवाय पर्याय नाही...!

खाजगी बसधारकांनाही 27 ऑक्टोबरपासून 'ट्वेंटी ट्वेंटी' शिवाय पर्याय नाही...!

प्रकाशन: 26 Oct 2021 10:50 AM
वाचन संख्या 62

वाढत्या इंधन व इतर महागाईमुळे तिकिट दरांमध्ये नाईलाजानेच ‘वीस टक्के ‘वाढ करावी लागणार असा खाजगी बस वाहन चालक -मालक व ऑपरेटर यांच्या बैठकीत एकत्रीत निर्णय .

कणकवली | उमेश परब : दिवसेंदिवस डिझेलचे दर वाढत आहेत. तसेच रस्ते खराब झाले आहेत. त्या तुलनेत प्रवाशांकडून मिळणारे तिकीट दर यामुळे वाहने रस्त्यावर चालवणे कठीण होऊन बसल्यामुळे खाजगी वाहन चालक मालक व ऑपरेटर यांच्या एकत्रित निर्णयाने सोमवार पासून मुंबई, पुणे, नाशिक ,कोल्हापूर येथे जाणाऱ्या खाजगी बस बंद ठेवून संप करण्याचा निर्णय  घेण्यात आला होता.  मात्र, या संपावर तोडगा काढण्यासाठी  कणकवली तालुक्यातील  हुंबरठ येथील हॉटेल सावली येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत वीस टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला आहे. मात्र, भाडेवाढीचा निर्णय झाला आहे .मात्र हा निर्णय झाला असला तरी सोमवार आणि मंगळवार दोन दिवस गाड्या बंद राहणार असून २७ ऑक्टोबर पासून नवीन तिकीट दर लागू होऊन गाड्या सुरू होतील असे खाजगी बस चालक-मालक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
  ऐन दिवाळीच्या तोंडावर गोवा ,सिंधुदुर्ग वरून मुंबईला फिरायला जाण्यासाठी बरेच जण खाजगी बसने बाहेर पडतात. त्यावेळीच या खाजगी बस मालक, चालक व ऑपरेटर यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार होती.
मात्र, हुंबरठ येथे सोमवारी बैठक होऊन समग्र चर्चेअंती भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला  बस चालक, मालक संघटना अध्यक्ष अनिल चव्हाण, उपाध्यक्ष प्रसाद मांजरेकर ,गिरीश बाणे ,उदय देसाई ,विशाल मांजरेकर ,रुपेश कुर्ले, उमेश हळदणकर, राजू मुजावर , हर्षद प्रभु ,महेश धोंड, राजन कुमठेकर, संजय, विजय , आनंद लोहे, शिवा मांजरेकर,  सिद्धेश परब , महेंद्र काळभोर ,मनोज चौगुले तसेच गोवा, मुंबई,पुणे येथील वाहन मालक, चालक , ऑपरेट उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स