आजपासून एसटीमध्ये 'सतरा पाॅईंट सतराची यात्रा....!'
कणकवली | उमेश परब : गगनाला भिडत चाललेले इंधनाचे दर,कोरोनाकाळात जवळपास ठप्प झालेली सेवा यांचा जबरदस्त फटका एस.टी.महामंडळ व कर्मचार्यांनी भोगलेला आहे. त्यावर आर्थिक हानी संपूर्ण भरुन येणे जरी शक्य नसले तरीही थोडाफार तोट्याचा तरी टक्का कमी करणे ही एस.टी.सेवेची आवश्यकता आहे हे विचारात घेऊन दिवाळीच्या आधीच एसटी महामंडळाने प्रवासी तिकिट दरात 17.17 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ट्विटरच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती दिली.
ही भाडेवाढ आज 26 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे.
कोरोना काळात एसटी महामंडळाला बसलेला मोठा फटका आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे तिकीट दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला अधिकचे 50 कोटी रुपये गोळा होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, “कोरोना काळात मंडळाला बसलेला आर्थिक फटका आणि डिझेल दरवाढीमुळे एसटीचे प्रवासी भाडे 17.7 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. ही नवीन दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. महामंडळाने तब्बल तीन वर्षानंतर दरवाढ केली आहे.”
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार साधी जलद व रात्री सेवेसाठी प्रति टप्पा 9.7 रुपयांची वाढ करण्यात आली असून निम आराम व शयन आसनी सेवेसाठी प्रति टप्पा 12.85 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवशाही सेवेसाठी प्रति टप्पा 13. 35 रुपये तर शिवनेरी सेवेसाठी 19.50 रुपये प्रति टप्पा दर आकारण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)