ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला निषेध.

बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला निषेध.

प्रकाशन: 09 Dec 2024 09:50 PM
वाचन संख्या 117

वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे केले आंदोलन.

ब्यूरो न्यूज : बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असून त्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज ९ डिसेंबर रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन छेडण्यात आले. माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेधाचे फलक झळकावत बांग्लादेश सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच हिंदूंच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घेण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले.

या निवेदनात नमूद केले आहे कि बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. तेथील मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. हिंदू महिलांवर देखील अमानविय पद्धतीने अत्याचार होत आहेत. ही बाब अत्यंत दुःखदायक असून सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन बांग्लादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,संघटक बबन बोभाटे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,उपनेत्या जान्हवी सावंत,गणेश गावकर, नागेश ओरोसकर,गंगाराम सडवेलकर, सचिन सावंत, बंडू ठाकूर, बाबी जोगी, छोटू पारकर, अवधूत मालणकर, सचिन काळप, सागर भोगटे,अमित भोगले, संतोष परब, धीरज मेस्त्री, योगेश तावडे, सुशील निब्रे, रवी कदम, सचिन ठाकूर, सुनील कदम, सिद्धेश मांजरेकर यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स