तोंडवळी येथे बीच क्लीनिंग मशीनद्वारे किनारा स्वच्छता.
आचरा | ब्यूरो न्यूज : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडून मालवण तालुक्यातील समुद्रकिनारी लगतच्या गावांना वापरण्यासाठी प्राप्त झालेल्या बीच क्लीनिंग मशीन द्वारे सोमवारी सकाळी ग्रामपंचायत तोंडवळी मार्फत तोंडवळी, तळाशील भागातील समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवली गेली.
या मोहीमेचा शुभारंभ तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामसेवक युती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अनन्या पाटील, मानसी चव्हाण, नरेंद्र मेस्त, भुपाल मालंडकर, गिता पाटील, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी निलेश पाटील, राजा पेडणेकर, सुचिता तारी आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)