ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
२१ डिसेंबर हा जागतीक ध्यान दिवस म्हणून जाहीर.

२१ डिसेंबर हा जागतीक ध्यान दिवस म्हणून जाहीर.

प्रकाशन: 08 Dec 2024 09:54 AM
वाचन संख्या 54

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत प्रस्ताव मंजूर.

ब्यूरो न्यूज : २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा असा लिकटेंस्टिन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शुक्रवारी एकमताने मंजूर केला. ही माहिती संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी दिली.

त्यांनी म्हटले आहे की, २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला.वसुधैव कुटुंबकम (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) अशी भारताची धारणा आहे. माणसाच्या कल्याणासाठी सर्व जगाने एकजुटीने प्रयत्न करायला हवे, असे भारताला वाटते. जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी २०१४ साली भारताने पुढाकार घेतला होता. त्याची आठवण करून देत पर्वतनेनी हरीश यांनी म्हटले आहे की, जागतिक योग दिन ही गेल्या दहा वर्षांत जागतिक चळवळ बनली आहे. जगभरातील कोट्यवधी लोक योगासनांचे धडे घेत आहे. तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आधुनिक जगातील बदलांना सामोरे जाताना तसेच मानसिक शांती मिळविण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे. लिकटेंस्टाइनने मांडलेल्या ठरावाला भारत, बांगलादेश, बल्गेरिया, बुरुंडी, डोमिनिकन रिपब्लिक, आइसलँड, लक्झेंबर्ग, मॉरिशस, मोनाको, मंगोलिया, मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया या देशांनी अनुमोदन दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स