शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा साळगावात मनसेला धक्का.
साळगाव घाटकर वाडितील अनेक मनसे कार्यकर्ते शिवसेनेत.
कुडाळ : शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळ तालुक्यातील साळगावात मनसेला धक्का दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत साळगाव येथे घाटकरवाडीतील मनसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उपनेते संजय आग्रे, उप जिल्हाप्रमुख राजा गावडे, विश्वास गांवकर व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवेशकर्त्यांनी शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.
साळगाव घाटकरवाडी प्रवेशकर्त्यांमध्ये नागेश शिंदे, कृष्णा घाटकर, अशोक घाटकर, अमोल घाटकर, किरण घाटकर, साईश शिंदे, ओंकार घाटकर, बाळा घाटकर, लवू घाटकर, अनिकेत घाटकर, बाळकृष्ण घाटकर, कृष्णा सावंत, विजय गायचोर, गुणाजी घाटकर, सदाशिव गायचोर, जनार्दन कदम, प्रथमेश घाटकर, अरुण गायचोर, रंजना घाटकर, अनुजा घाटकर, सरिता घाटकर, उत्कर्षा घाटकर, सेजल घाटकर, सीमा घाटकर, प्रियांका घाटकर, रसिका घाटकर, संजय घाटकर, महादेव घाटकर, सुचिता शिंदे, कांचन घाटकर, जयश्री शिंदे, रामचंद्र घाटकर, संकेत घाटकर, अमित गायचोर, शुभांगी गायचोर, देवेंद्र गायचोर यांचा समावेश आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)