माझ्यावर आरोप करण्या अगोदर कुठल्याही शासकीय कामात माझा संबंध आल्यास तो पुराव्यानिशी जाहीर करावा.
श्री. निलेश राणे यांचे प्रसिद्धीपत्र.
सिंधुदुर्ग : महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे का सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्याकडून काही रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आले. यात शासकीय ठेकेदार व शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे माझ्याशी संबंधित व्यक्ती यांच संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. मात्र सदरील खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नसून ठेकेदारी किंवा ठेकेदार या बाबतही माझा कुठे संबंध नाही. मी व्यक्तिगत ठेकेदारी करत नाही किंवा कुठल्याही ठेकेदारांशी कुठल्याही शासकीय कामात माझी भागीदारी नाही. आज पर्यंत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मी कधीही कुठल्याही ठेकेदाराकडून अर्थसहाय्य किंवा वस्तूरुपात मदत मागत नाही, मदत घेत नाही किंवा त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाही करत नाही.
निलेश राणे यांनी प्रसिद्धीपत्रात म्हणले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांना माझ्या नावावर कुणीही फोन करत असेल किंवा इतर आर्थिक मागणी करत असेल तर त्यांनी याची तक्रार जवळचे पोलीस स्टेशन अथवा जिल्हा पोलीस अधिक्षकांजवळ द्यावी, माझ्या नावाचा वापर करून कुणीही ठेकेदारांकडून किंवा इतर कुणाकडूनही रोख रक्कम अथवा इतर काही मागणी करत असल्यास संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पोलीस अधिक्षकांशीबोलून अश्या व्यक्तींवर कारवाईसाठी सूचित करेन. ज्यांचा व्यवसायच ठेकेदारी आहे त्यांनी अश्या प्रकारे माझ्यावर आरोप करण्या अगोदर कुठल्याही शासकीय कामात माझा संबंध आल्यास तो पुराव्यानिशी जाहीर करावा.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)