हिवाळे येथे शिवसेना उ. बा. ठा. पक्षाला पुन्हा धक्का.
खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील हिवाळे गावात भाजपने उबाठा गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. अनेक उबाठा कार्यकर्त्यांनी खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सर्व कार्यकत्यांचे माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजप पक्षात स्वागत केले.
गेल्या काही दिवसापासून उबाठाने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेत आहेत. वैभव नाईक यांच्या अपयशी कार्यपद्धतीला जनते सोबत त्यांचे कार्यकर्ते ही कटांळले आहे अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली. प्रवेशकर्ते मोहन परब, गणेश राणे, सुभाष परब, विश्वनाथ परब, प्रभाकर परब, रामा मेस्त्री, गणेश पवार, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
यावेळी जिल्हा बॅंक संचालक बाबा परब, जिल्हा परिषद माजी सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परूळेकर, सरपंच रघुनाथ धुरी, बुथ अध्यक्ष विश्वनाथ परब, माजी सरपंच विश्वास परब, भाई घाडीगावकर, नयन कुलकर्णी, मच्छिंद्र परब, राजू परब, कृष्णा परब, प्रकाश परब, यांच्या सह अन्य भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)