नेते निलेश राणे २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज करणार दाखल.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ मालवण विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा नेते निलेश नारायण राणे उद्या सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे तसेच महायुती भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १० वाजता कुडाळ कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निलेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करतील.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)